Ticker

6/recent/ticker-posts

गरजवंत.रुग्नांनी लाभ घ्यावा

 ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे भव्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन



चिखलदरा तालुका प्रतिनिधी-नितीन वरखडे

 मेळघाटातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या,आदिवासी बहुल क्षेत्र, निसर्गरम्य नगरी चिखलदरा तालुक्यातील चुरणी गावात शासकीय  ग्रामीण रुग्णालयांतर्गत 14 मार्च 2022 ते 17 मार्च 2022 या कालावधीत भव्य दंतरोग शिबिर व शस्त्रक्रिया मोफत ठेवण्यात आली आहे. मेळघाटातील सर्व गोरगरीब जनतेने शिबिराचा लाभ घ्यावा व आपले कुटुंब निरोगी ठेवावे, असे आवाहन चुरणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदेव वर्मा सर यांनी मेलघाट येथील रहिवाशांना केले आहे, ज्यामध्ये हर्निया, हायड्रोसिल  सारख्या पुढील आजार , शरीरातील विविध प्रकारच्या गुठळ्या, आणि दातांसंबंधी ऑपरेशन्स आणि निदान केले जाईल, त्यासोबत मानसिक रोग, त्वचा आणि गुप्त रोग, डोळ्यांच्या समस्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन, स्त्रियांशी संबंधित रोग आणि त्यांचे उपचार, आणि लहान मुलांशी संबंधित रोग, बिपी, शुगर, दमा, हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार केले जातील, शिबिरात प्रत्येक प्रकारच्या तपासण्या, निदान, उपचार पूर्णपणे मोफत आहेत. या भव्य शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूजेपासून केली आहे. या शिबिरात चुरणी गावच्या प्रथम महिला सरपंचा सौ. सुमिता ताई दारसिंबे मॅडम यांना अध्यक्षस्थान देण्यात आले, त्याचवेळी अमरावतीहून आलेले  डॉक्टर,शैल्य चिकित्सक,सर्जन, शायल डॉक्टर, सर्जन यांचे शाल, नारळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये उपस्थित सर्व डॉक्टर डॉ.अग्रवाल सर (जनरल सर्जन),  डॉ.मेंढे सर (कान, नाक,घसा तज्ञ)  डॉ.  प्रविण मुरले (अस्थीरोगतज्ज्ञ), डॉ.जावरकर सर (बालरोगतज्ज्ञ) डॉ. रामदेव वर्मा सर (ग्रामीण रुग्णालय चुरणी वैद्यकीय अधीक्षक), डॉ.  साहेबलाल धुर्वे सर, डॉ. दासरवार सर, डॉ.कावरे सर, डॉ.अजय ढोसरे, डॉ. अमित पातोंड, डॉ. सचिन साबळे, डॉ.  पंकज माहूरकर, डॉ.  शितल अन्नपुर्वे, डॉ. अंकुश देशमुख, डॉ.  मनोज दाणे, डॉ.वैभव सातपुते, डॉ.सागर कोकडे, प्रमुख पाहुणे संतोष ठाकरे, सतीश चामट, राजेंद्र बेलखेडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments