Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विद्यार्थांचे व आदिवासी समाज संघटनाचे अन्नत्याग आंदोलन

मेलघाटातील कुपोषण,बालमृत्यु, मातामृत्यु याची सीबीआई चौकशी करा अशी मागणी

Chikhaldara


चिखलदरा तालुका प्रतिनिधी-नितीन वरखडे

आदिवासी विभागाने तत्काळ पदभरती करावी.या प्रमुख मागणीला घेऊन आदिवासी विद्यार्थांनी व आदिवासी संघटनानी राणी दुर्गावती चौक परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकर भरती निर्णयाची अजुनही अंमलबजावणी केली नाही. ज्यामुळे 12 हजार 500 जागा ह्या बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी संघटनानी व आदिवासी विद्यार्थांनी केला आहे.6 जुलै 2017 चा सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा अपमान केला जात आहे.त्यामुळे खऱ्या आदिवासी युवा शिक्षित वर्गाचे नुकसान होत आहे.त्यामुळे प्रामुख्याने राज्यातील 12 हजार पाचशे आदिवासींची रिक्त पद तत्काळ भरावे.अमरावती शहरात स्पर्धा परीक्षासाठी योजना लागु करण्यात यावी.सण 2020-21 या काळातील आदिवासीं विद्यार्थांची DBT तत्काळ द्यावी.

अमरावती येथील आदिवासीं मुलां-मुलींची वस्तिगृहाची कामे तत्काळ पूर्ण करा,2021 मध्ये मेलघाट मध्ये 365 बालक व 15 मातामृत्यु झाली आहे ,याची CBI चौकशी करा,व महेन्द्री अभयारण्य बंद करा,भूमिहीन आदिवासी यांना सरकारी नियमानुसार शेती देण्याची मागणी केली आहे .यावेळी आंदोलन कर्ता ,अर्जुन भाऊ युवनाते,जगदेव इवने,सविता वाघमारे,गायत्री धांडे, पुजा ठाकरे,सुभांगी चव्हाण,यशस्वी चावरे, प्रिया चव्हाण,रोहित साकर्डे,नेहा वाघमारे,नितेश उके,सुभाष रामापुरे,शुभम ठाकरे,मयुर ठाकरे ,साक्षी ठाकरे,पवन सोलंके ,यांच्यासह शेकडो आदिवासी विद्यार्थी व आदिवासी संघटनानी विविध 17 प्रकारचा  मागनी घेऊन अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

Post a Comment

0 Comments