Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाचे अडीच शहाणे बिघडवत आहेत अमरावती चे वातावरण

 


अमरावती-अमरावती भाजपातील अडीच शहाणे हिंदुत्वाच्या नावावर अमरावती शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असून किरकोळ भांडणास  जातीय रंग देत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केला आहे. जोशी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांच्या भांडणास जातीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असून अमरावती पोलिस आयुक्तांनी  हा प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहन प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केले आहे.

                          १२  नोव्हेंबर पासून अमरावती  शहरातील शांतता संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असून दंगलीचे डोहाळे लागलेल्या भाजप नेत्यांनी व भाजप प्रणित आमदाराने  शिवरायांच्या पुतळ्यावरून केलेल्या राजकारणामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते , तो  तणाव आता कुठे नीवळत असतानाच जोशी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांच्या भांडणात गरज नसताना '  बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना '  या धर्तीवर भाजपाने  एका गटातर्फे उडी घेतली आहे. जोशी व्यापारी संकुलातील  व्यापाऱ्यांच्या अंतर्गत भांडणास अमरावती भाजपा जातीयवादाचा रंग देऊन राजकीय पोळी शेकलण्याचा प्रयत्न करीत असून हा  प्रकार अमरावतीकर खपवून घेणार नाहीत असा इशाराही दिलीप एडतकर यांनी दिला आहे.

          जोशी व्यापारी संकुलात झालेल्या प्रकारात दोषी असणाऱ्या वर पोलिसांनी कारवाई करावी सोबतच  या प्रकरणास जातीवादाचा रंग देणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई करावी असे आवाहनही दिलीप एडतकर  यांनी केले आहे. उत्तर प्रदेशासह चार राज्यात विजय मिळविल्यानंतर चेकाळलेले भाजपवाले शहरात येणकेण  प्रकारेनं धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून काश्मीर फाइल्स हा चित्रपट त्याचप्रमाणे होळी व  रंगपंचमी या निमित्ताने भाजपचा जातीय ज्वर उफाळून येण्याची शक्यता गृहित धरून पोलीस आयुक्तांनी जातीयवादी भाजपा नेत्यांवर नजर ठेवावी अशी मागणी करत सुविद्य शांतीप्रिय अमरावतीकरांनी जातिवाद्यांचा  कुटील डाव ओळखून सर्व धर्म समभाव राखावा असे आवाहनही  दिलीप एडतकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments