Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाईंच्या स्वयंशिक्षित आणि महिला शिक्षण मोहीमेमुळे महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर

Vidarbhadoot amravati


अमरावती -क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ ,आणि कवयित्री होत्या. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली.त्यांना भारतीय स्रीवादाची जननी मानले जाते. तत्कालीन विषम परिस्थितीत संघर्ष करीत समाज व्यवस्थेचे कटू घाव झेलून  सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य, आणि सामाजिक उत्थान आदि कार्य अविरतपणे सुरू ठेवले. महिलांचे शिक्षण, आणि जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल देश नेहमी सावित्रीबाई फुले यांचे ऋणी आहे.सावित्री बाईंच्या  स्वयंशिक्षित आणि महिला शिक्षण मोहीमेमुळे  महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन  आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले.

महापालिका क्षेत्रातील  रेखा कॉलोनी- जवाहर नगर-नवसारी परिसर स्थित चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक नामफलकाचे अनावरण रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे हस्ते करण्यात आले. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वशाखीय माळी महासंघाचे अध्यक्ष-डॉ. गणेश खारकर, दिपकराव वैराळे, गणेशराव जामोदकर, ओमप्रकाश उपाख्य राजाभाऊ चर्जन ,छाया कथीलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समनवयक-संजय खोडके, ऍड.सुनील बोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक-प्रशांत डवरे, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत महल्ले आदी उपस्थित होते.सर्वप्रथम आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व अतिथींचे स्थानिकांचे वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले वसतिगृह, सावित्रीबाई फुले वाचनालय,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था आदींसह अन्य मान्यवरांचे वतीने यावेळी आमदार महोदय यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.रूढी,अनिष्ट प्रथा, महिलांचे जीवनमान सुधारण्याच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्याचे प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या शब्दात डॉ. गणेश खारकर यांनी सांगितले.

  इतिहासकालीन नारीशक्ती च्या अविस्मरणीय कार्यापासून प्रेरणा घेऊन नवीन पिढीला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा वसा जोपासना करणे सुलभ व्हावे. याकरीता मनपाच्या आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करीत  आता हा चौक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. असे नगरसेवक-प्रशांत डवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी अतिथींची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-संदीप जुनघरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments