Ticker

6/recent/ticker-posts

युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचे आदर्श विचार आत्मसात करा ; संतोष अवसरमोल

 घाटबोरीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन



मेहकर- प्रौढ प्रतापपुरंदर, महापराक्रमी,रणधुरंदर,क्षत्रीय कुलवंतस् ,सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज,महाराज श्रीमंत श्रीश्रीश्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना मेहकर तालुक्यातील घाटबोरीमध्ये अभिवादन करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार समाजाला मार्गदर्शक आहेत.मोगलाईला नेस्तनाबूत करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. सर्व जातिधर्माच्या मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले,रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका असे बजावून रयतेची काळजी घेणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज होते.त्यांची प्रतिमा मनात बाळगत असताना त्यांचे आदर्श विचार खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीने डोक्यात घेऊन आत्मसात केल्यास समाजात कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही. महाराजांची दूरदृष्टी,आदर्श राज्यकारभार आणि रणनीती, सर्वोत्कृष्ट नेतृत्व समाजाच्या कल्याणासाठी प्रेरणादायी आहे.त्यामुळे महाराजांचे आदर्श विचारच तूमच्या आमच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरक ठरतील.असे मत पत्रकार संतोष अवसरमोल यांनी व्यक्त केले.

घाटबोरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतानी बोलत होते. यावेळी रयतेचे राजे,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गावातील अनेक नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवेमय वातावरणात छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. 

यावेळी अभिवादन करण्यासाठी महादेव पाटील घुणे, सोपान पाटील इंगोले, मेहकर पं स लिपिक गजानन धामनकर, पत्रकार संतोष अवसरमोल, तानाजी नवले, विजय उदेभान नवले, अरविंद राठोड, अंकुश जाधव,आनंदा नवले, गजानन बुळे, संतोष खेडेकर,श्रीराम वाळेकर,रवि नवले, अमोल चावरे, गणेश खोडके, देवानंद काळे, मंगेश चेडाळने, संदिप गोटे,भारत अवसरमोल, गौतम चांदणे,सोनु काचेवर,श्याम वाळेकर, योगेश खोडके,वसंता खोडके, सतिष बिरकुले, विनोद चावरे, ऋषिकेश काचेवर, विष्णू चावरे, नागनाथ काचेवर,रतनाबाई चावरे, यमुनाबाई खोडके, शोभाबाई काळे, दुर्गाबाई चावरे,गौकर्णाबाई येलकर,शेषेकला वाळेकर,मंदाबाई हिवरकर,नलिनाबाई बुळे,आचल चावरे, अनेक महिला पुरुष अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संदिप गोटे, देवानंद काळे, अमोल चावरे, योगेश खोडके यांनी कोरोनाचे नियम पाळत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे, उत्कृष्ठ सुत्रसंचलन अरविंद राठोड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments