Ticker

6/recent/ticker-posts

शेंदला येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम




 जानेफळ- देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत पोलिओ देशात, राज्यात परत येऊ नये यासाठी राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.. 

त्या अनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एम.एम.राठोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच``` वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वामध्ये जि.प. मराठी उच्च प्राथ शाळा शेंदला येथे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपसरपंच श्री. किशोर रहाटे यांच्याहस्ते बालकाला पोलिओ डोस देवून शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेचा 0 ते 5 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने लाऊडस्पीकर तसेच दवंडीद्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी श्री.भुजंगराव रहाटे, श्री. धनंजय रहाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस, आरोग्य सेविका वैशाली सुरवाडे, आशा गतप्रवर्तक  सुमित्रा अंभोरे, अंगणवाडी सेविका सौ. उषा रहाटे,सौ. सुनीता अवसरमोल, आशा स्वंयसेविका  सौ. अनिता सरदार, नर्मदा सरदार व अंगणवाडी मदतनीस हजर होते.

यावेळी उपस्थितांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील पाल्यांना पोलिओ डोस देण्यात यावा असे आवाहन पालकांना करण्यात आले. या मोहिमेचा अनेक बालकांनी लाभ घेतला.``````

Post a Comment

0 Comments