Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


खामगाव:- बंजारा समाजाचे आराध्यदैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती हंसराज नगर,खामगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात.सर्वप्रथम संत सेवालाल महाराज्यांच्या प्रतिमेची पूजा करून प्रसाद,भोग व नैवेद्य आणि हंसराज नगर येथील नायक श्री वसंता आडे यांच्या हस्ते दाखविण्यात आला.तसेच हंसराज नगरातील सर्व गोर बंजारा आणि इतर नागरिकांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला फुले वाहून दर्शन घेतले.
   तसेच संत सेवालाल महाराज जयंती निमित्त धार्मिक,सामाजिक आणि बंजारा भजन कार्यक्रमाचे आयोजन करून पार पडले.या कार्यक्रमाला बंजारा समाजातील तसेच इतर समाजातील लोकं उपस्थित होते.जेष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ.संजीव राठोड, डॉ. परमेश्वर चव्हाण, डॉ.गुलाब पवार, डॉ. रविशंकर राठोड, डॉ.निलेश जाधव, डॉ. गौरव राठोड, डॉ. महेश राठोड, श्री. सुरेंद्रसिग पुरोहितजी, श्री.परसराम चव्हाण, श्री.दयाराम राठोड, संजय जाधव  श्री.देविदास राठोड, श्री.कैलास चव्हाण, श्री.गोविंद चव्हाण, लालसिंग चव्हाण, दिलीप चव्हाण, नथू चव्हाण,  बद्री राठोड,  रवी राठोड,

दिनकर राठोड,  नितेश राठोड,  रोहिदास आडे,  गणेशभाऊ आडे,दिलीप जाधव, रवी चव्हाण, गजानन चव्हाण, विजू चव्हाण,  विनोद राठोड,  सुरेश गुजर,  केशव मेसरे, श्याम देशमुख, किशोर देशपांडे, अजय मेटांगे, रवी आंधळे, संतोष कराळे यांच्यासह खामगाव शहर आणि हंसराज नगर भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments