Ticker

6/recent/ticker-posts

अपघातांमुळे नागरिकांचा संताप अनावर ,आंदोलनाचा इशारा

 आष्टी ते पूर्णानगर मार्गाच्या  दुरुस्तीला मूहुर्त केव्हा


वाढत्या घटनांमुळे नागरिकांचा संताप अनावर ,आंदोलनाचा इशारा



अमरावती (वार्ताहार) संतोष शेंडे 

अमरावती ते परतवाडा हा महामार्ग असून आष्टी ते पूर्णानगर दरम्यान या महामार्गाचीमो ठ्याप्रमाणात दुरावस्था झालेली आहे ,कित्येक किरकोळ अपघाताच्या घटना शिवाय मोठे अपघात देखील या दरम्यान घडले असताना लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे देखील दुर्लक्ष असल्याने नागरिकांचा संताप आता अनावर आलेला आहे ,त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे ,अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशाराही या माध्यमातून त्यांनी दिला आहे,


अमरावती-परतवाडा हा महामार्ग असून या मार्गावर २४ तास वर्दळ असते. पूर्णानगर ते वलगावदरम्यान या मार्गावर आतापर्यंत मोठे अपघात झाले आहे. कित्येकांचे बळी गेले आहे. त्यामुळे मागील एक-दोन वर्षांत वलगाव ते आष्टीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. तर याच मार्गावर पूर्णानगरपासून परतवाडापर्यंत काही किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, आष्टी ते पूर्णानगर या ५ किलोमीटर रस्त्याची अद्यापही दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामत: किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे हा रस्ता केव्हा दुरुस्त होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष द्यायची मागणी जोर धरत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील नागरिकांनी या माध्यमातून दिलेला आहे 



अमरावती परतवाडा या रोडवर जर शासनाकडून आकडेवारी  घेतली तर एकंदरीत आष्टी ते आसेगाव याच दरम्यान कित्येक निरपराध लोकांचा जीव याच खराब रस्त्यामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेला, असा एकही अधिकारी किंवा मंत्री नसेल की या रस्त्याचा प्रवास करत नसेल जिल्‍हाधिकारी पासून तर चपराशी पर्यंत सर्वाच ह्या रस्त्यावरून प्रवास करतात पण त्यांच्या महागड्या गाड्यांमुळे कदाचित हा रस्ता खराब आहे,

उमेश शामरावजी महिंगे ग्रा. पं. सदस्य पूर्णानगर



मी दूध उत्पादक शेतकरी आहे मी रोज  सकाळी दोनशे लिटर दूध अमरावतीला पोचवून द्यावे लागते पूर्णा नगर ते आष्टी हा जो अंदाजे ५ते६ किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे मला बरेचदा खराब रस्त्यामुळे दुधाच्या भरलेल्या कॅन खाली झाल्या माझ्या गाडीचे टायर फुटले आहे,

राहूल ठाकरे रा अचलवाडी

 


आष्टी ते पूर्णानगर हा रस्ता सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याकरिता पाच ते सहा किलोमीटर एवढाच नादुरुस्त ठेवलेला आहे, असे वाटते कारण या रस्त्यावरून महाराष्ट्र सरकार मधले दोन मंत्री बरेचदा येणे जाणे करतात ह्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे बरेचसे अपघात झाले आहे, आमच्या पूर्णानगर चे प्रतिष्ठित नागरिक श्री टेंबरे यांचा मक्रंपुर फाट्याजवळ गाडी खड्ड्यात उसळून मृत्यू झाला आहे कृपया आमच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये .

सुधीर रामकृष्ण बोबडे ,माजी सरपंच पूर्णा नगर



पाच ते सहा किलोमीटर तूकडा का बरं दुरुस्त केला जात नाही बरेचदा गाडीचा अपघात याच खड्ड्यांमुळे होताना दिसतात मीही एकदा या खड्ड्यांमुळे रात्री दहाच्या सुमारास खाली पडून माझा हात फॅक्चर झाला व माझ्या गाडीचे खूप मोठे नुकसान झाले,.

 जितेश बोबडे येलकी पूर्णा



हा मार्ग वर्दळीचा असून किरकोळ व्यवसाय करणाऱ्या करीत अति महत्वाचा मार्ग आहे ,परंतु हा रस्ता खराब झाल्याने या मार्गावर किती किरकोळ अपघात वाढले आहेत, शिवाय अनेकांचे नुकसान देखील झाले आहेत, त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये आम्ही करणार आहोत.

प्रदीप शेंडे ,उपसरपंच टाकरखेडा संभु 



या रस्त्याची दुरुस्ती करणे आता गरजेचे झाले आहे, कारण अपघाताच्या घटना वाढलेल्या आहेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,

अतुल गोरले, मक्रमपुर को-ऑपरेटिव बँक कर्मचारी

Post a Comment

0 Comments