Ticker

6/recent/ticker-posts

भयानक, साळ्याने केली जावयाची हत्या, दोघांविरोधात गुन्हा दाखल


 टाकरखेडा संभु (वार्ताहार) संतोष शेंडे 

 दोन संख्या भावंडामध्ये सुरू असलेला वाद सोडविण्या करीता गेलेल्या जावयाची चाकु सारख्या शस्त्राने हत्या केल्याची घटना वलगाव येथे रविवारी 20 फ्रेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली,या प्रकरणी फिर्यादी गंगा कन्हैया पवार वय २८ वर्षे रा. रेल्वे स्टेशन समोर देशमुख प्लाॅट अकोट जि. अकोला. ह. मु. सुरज लेआवुट  सिकची रिसोर्ट मागे  यांच्या तक्रारी वरूनबि सन रघुनाथ शिंदे, राजेश रघुनाथ शिंदे व किसना भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे,

यात हकिकत अशी आहे की यातील आरोपी नं १ व २ हे फिर्यादीचे भाऊ असुन आरोपी नं ३ हा पण नातेवाईकच आहे. २०-२-२०२२ रोजी रात्री यातील आरोपी बाजुचे पाला मध्ये जेवण करीत असता आरोपी १ व २ मध्ये  शाब्दिक वाद सुरु होता. तेव्हा यातील फिर्यादी आरोपीची बहिण व मृतक नामे कन्हैया शंकर पवार  हे यातील आरोपी १ व २ यांना समजावत असता 

आरोपी नं ३ ने म्हटले कि कन्हैया पवार तुमच्या मध्ये का बोलत आहे ,यालाच मारा. म्हणून आरोपी नं. ३ ने चाकु सारखा दिसणारं बलम आरोपी नं १ कडे दिला व आरोपी नं २ ने मृतकास पकडुन ठेवले व. आरोपी नं १ ने जिवानिशी मारले. यातील  आरोपीतांनी संगनमत करून कन्हैया पवार चा खुन केला आहे. आरोपी गुन्हा केल्या पासुन फरार झाले असुन आरोपीला शोधण्यासाठी शोध पथके रवाना केले असुन आरोपीला शोधून अटकेची कारवाई करीत आहेत.

Post a Comment

0 Comments