Ticker

6/recent/ticker-posts

संकल्प देहदानाचा

 

श्री.संत राजेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देहदाणाचा संकल्प करणारे सवाई दाम्पत्यांचा सत्कार

 टाकरखेडा संभु( वार्ताहार)संतोष शेंडे

वडील वामनराव सवाई यांनी केलेल्या मरणोप्रांत देहदानाची परंपरा कायम ठेवत समाजसेवी विजय सवाई व पौर्णिमा सवाई  यांनी देखील मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला आहे, त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा याशिवाय या दाम्पत्यांना प्रोत्साहन देण्याकरिता संत राजेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

 वाचनालयाचे कार्यवाहक व ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप शेंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रश्मी देशमुख यांच्यासह व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक मेश्राम,

 पोलीस पाटील अजय मोहकर,संचालक संजय टवलारे संचालक व मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका अध्यक्ष संतोष शेंडे, किसनराव पिंगळे कु.आर एम खटाळे,ग्रामपंचायत सदस्या सोनाली जामठे ,अरुण कांडलकर ,वैकुंठ देशमुख , आदींची प्रमुख उपस्थिती होती,कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायन कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार अशोकराव शेंडे यांनी केले, मृत्यूनंतर शरीर हे नश्वर असते ,अखेर त्याची माती झाल्याशिवाय काही उपयोग होत नाही, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या मृत्यूनंतरही देहाचा  सदुपयोग व्हावा असे वाटत असेल तर प्रत्येकाने मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला पाहिजे ,जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टरांना याचा फायदा होईल, पर्यायाने तज्ञ डॉक्टर निर्माण होतील ,असे प्रतिपादन पौर्णिमा सवाई  व विजय सवाई  यांनी सत्कार याप्रसंगी व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप शेंडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रंथपाल विद्या शेंडे, पियुष मेश्राम,आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments