Ticker

6/recent/ticker-posts

सत्यशोधक विचार साहित्य संमेलनाची बैठक

 

Vidarbhadoot

अकोला- औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय सत्यशोधक विचार साहित्य संमेलनाची नियोजन बैठक अकोला येथे शुक्रवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे होते.

 बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड यांनी केले. सत्यशोधक विचार हा समाजाला नवी दिशा देणारा असून, हा विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय सत्यशोधक विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शब्दवेल साहित्य मंच मुंबईचे प्रवीण बोपूलकर, जागर फाउंडेशनचे तुळशीदास खिरोडकार, संवाद साहित्य मैफिलचे राजू चिमणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत पहिल्या राज्यस्तरीय सत्यशोधक विचार साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. वास्तववादी साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा, समाजाला नवी दिशा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन साहित्य संमेलनात करण्याचे ठरले. पहिले राज्यस्तरीय हे साहित्य संमेलन औरंगाबाद नगरीत २८ नोव्हेंबर २०२२ आयोजित करण्याचे ठरले.  हे संमेलन तीन दिवसीय राहणार असून, यामध्ये ज्वलंत विषयावरील परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, गझल मुशायरा, प्रबोधन कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments