Ticker

6/recent/ticker-posts

भारतातील प्रत्येक स्त्री ने माँ साहेब जिजाऊंच्या विचारांचे पाईक व्हावे - मनोज जाधव

 ग्रामपंचायत  पेठ येथे माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Manoj jadhav


पेठ - माँ साहेब जिजाऊ व  स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी  गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत चे  ( सरपंच ) विष्णूपंत शेळके , मनोज जाधव - ( विदर्भदूत जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा ) व भगवान गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कडुबा टेंगसे , ज्ञानेश्वर शेळके , दिनकरराव डुकरे , मारुती तायडे  ,परमेश्वर शेळके , नंदाताई शेळके व कर्मचारी माधव यादव , राजेंद्र पांढरे , विठ्ठल शेळके , शिवा यादव ,सचिन झालटे , गजानन गवई , त्याचप्रमाणे ,विठ्ठल शेळके कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले. तर सचिव समाधान पडघान यांनी आपले विचार मांडताना आजची स्त्री ही शिकली पाहिजे तेच खरे अभिवादन माँसाहेब जिजाऊना ठरेल. त्यानंतर  विठ्ठल शेळके यांनी सुद्धा माँ साहेबांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. व उपस्थित सर्वांनी राजमाता माँसाहेब जिजाऊंचे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्या नंतर मनोज जाधव यांनी सांगितले माँसाहेब जिजाऊंचे  विचार महान होते. म्हणून माँ साहेब यांनी छत्रपती घडवून अवघा  हा महाराष्ट्र उभा केला. त्यानी सांगितले राज्याची धुरा वाहणारी  ती न्यायिका शासनकर्ती होती. तिच्याच स्फुर्तीच्या प्रेरणेत  उजळल्या स्वराज्याच्या ज्योती. आजच्या स्त्री ने माँसाहेब जिजाऊ यांचे विचार व त्यांच्या कार्याचे आचरण करणे ही काळाची गरज आहे. मोघलांचे राज्य असताना सुद्धा मासाहेब न डगमगता त्यांनी अन्यायाला विरोध केला. लढावे कसे आणि जगावे कसे हे माँसाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. लख लख तळपत होती त्यांची शत्रूच्या मानेवर तलवार , अशा राजेंना घडवणारी माऊली होती खरी शिल्पकार.

 त्याचप्रमाणे  स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे परिषद घेऊन भारतीयांना एक नवी दिशा देणारे मार्गदर्शन केले. त्यांची  बुद्धिमत्ता महान होती. त्यांनी जे वाचन केले ते त्यांनी कधीही परत बघितले नाही एवढी महानता त्यांच्यात होती. म्हणून भारतातील प्रत्येकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समोर गेले पाहिजे. हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल यानंतर ग्रामपंचायत सदस्य पती ज्ञानेश्वर शेळके यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments