Ticker

6/recent/ticker-posts

चिखली अर्बनचे सतिष गुप्ता व पुरुषोत्तम दिवटे यांच्यावर हल्ला, कारसह, रोकड पळविली



चिखली- मनोज जाधव- औरंगाबाद नाशिक रोडवरील पोलीस स्टेशन सिल्लेगाव क्षेत्रात पिंपळगाव नजीक चिखली येथील चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिष गुप्ता व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांची इनोव्हा कार आडवून दरोडेखोरांनी दराडा घातला. या मार्गावरील शिवनेरी धाब्याजवळ १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामध्ये चालक किशोर इंगळे यांच्यासह अध्यक्ष सतिष गुप्ता व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे जखमी झाले आहेत. तिघांवरही सिटी केअर हॉस्पीटल औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.
नांदगांव येथे बँकेच्या मिटींगसाठी अध्यक्ष सतिष गुप्ता व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे गेले होते. बैठक अटोपल्यानंतर मुक्कामी औरंगाबाद येथे जात असतांना हा हल्ला झाला आहे. 

दरोडेखोरांनी एका ठिकाणावरुन कार चोरली होती. नंतर चोरलेली कार रस्त्यावर आडवी लावण्यात आली होती. त्यामुळे रस्ता आडविण्यात आला होता. गुप्ता यांनी खाली उतरुन कार बाजूला घ्या म्हणत दरोडेखोरांना जाब विचारला असता, त्यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यामध्ये दिवटे व कारचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांजवळ लोखडी रॉड व इतर घातक शस्त्र होते. यामध्ये तीघेही जण जखमी झाले आहेत. याच मार्गावरुन जाणारांनी तिघांनाही दवाखाण्यात पोहचविले. आता तिघांचीही प्रकृती चांगली आहे. 

दरोडेखोरांनी यामध्ये इनोव्हा कार, रोकड व रिव्हाल्वरसह काडतूसही पळविले. नंतर पळविलेल्या कारचा दरोडेखोरांनी अपघात केल्याचेही वृत्त आहे. त्यामध्ये कारचेही बरेच नुकसान झाले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याचेही वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तपासचक्रे जोरात फिरवून रात्रीच दरोडेखोरांना अटक केली असल्याचे समजते.

दरम्यान झालेल्या घटनेने चिखलीसह बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विविध अफवा पसरत आहेत. त्यामुळे सतीष गुप्ता यांचे चिरंजीव डॉ. अशुतोष गुप्ता यांनी अवाहन केले आहे, की कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तिघा जणांचीही प्रकृती आता ठणठणीत आहे.

Post a Comment

0 Comments