Ticker

6/recent/ticker-posts

कावड व छोट्या पालख्यांना राजेश्वर मंदिरासमोरून जाण्यास प्रतिबंध नसावा- डॉ अशोक ओळंबे



अकोला- श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा कावड उत्सव हा अकोला जिल्ह्यात साजरा करण्यात येतो.अकोला जिल्ह्यात सर्व कावड व पालख्यांना प्रतिबंध असून महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मंदिरामध्ये प्रवेश नाकारल्या जात आहे.



 कोविड १९ संसर्ग पाहता प्रशासनाने केलेला प्रतिबंध योग्य असला तरी शिभक्तांची श्रद्धा राजराजेश्वरावर असल्यामुळे कोविड १९ नियम पाळत पाच ते दहा शिवभक्त पालखी ऐवजी कावड नी पूर्णा नदीच्या पत्रातून जल आणून स्थानिक परिसरातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन अभिषेक करत आहेत. परन्तु शिवभक्तांना कावड घेऊन व छोटी पालखी घेऊन मंदिरात जाण्यास प्रतिबंध असल्यामुळे किमान राजेश्वर मंदिराच्या मुख्य दारासमोरून मुख्य रस्त्याने जाऊ द्यावे अशी मागणी शिवभक्त करीत आहेत ज्यामुळे रहदारीला कोठलाही अडथळा वा असुविधा होणार नाही व कोविड १९ च्या नियमांचे शुध्द पालन होईल.





शिभक्तांचा भावनेची दखल घेऊन कावड व छोट्या पालख्यांना राजेश्वर महाराज मंदिरासमोरून जाऊ द्यावे अशी मागणी यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी तिसऱ्या (श्रावण) सोमवारी प्रथम आगमन झालेल्या कावड व पालखीचे पूजन करतांना केली. यावेळी शिवभक्तांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments