Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू यंग ब्रिगेडचा स्तुत्य उपक्रम



समाजसेवक किसनराव हुंडीवाले जयंती प्रित्यर्थ २०० वृक्षाचे वितरण

अकोला - खडकी बु. येथील प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक तथा महाराष्ट्र गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष, खडकी विभागाचे भूषण स्व. किसनराव यमाजी हुंडीवाले यांच्या ६७ व्या जयंती निमित्त खडकी बु.येथे ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व छत्रपती शाहू यंग ब्रिगेड खडकी बु. अकोला तर्पेâ सर्व रक्तदात्यांना  महापुरुषांचा फोटो, मोमेंटोसोबत वेगवेगळ्या जातीचे २०० वृक्षाचे वाटप करण्यात आले. रक्तदाना इतकीच वृक्षारोपणाचीही अत्यंत गरज असतांना, जिकडे तिकडे ़काँक्रीटीकरण होत असतांना, पर्यावरणाचा समतोल राखावयाचा झाल्यास वृक्षारोपण करणे व त्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे साहित्यीक, पत्रकार पंजाबराव वर यांनी विचार व्यक्त केले. 




संस्थेचे अध्यक्ष रोशन गायकवाड, प्रवीण हुंडीवाले, शंकरराव बिरकड, महादेवराव शिंदे, शंकरराव लंगोटे, प्रल्हाद ढोरे, लखुआप्पा लंगोटे, खताळे पाटील, यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षाचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रोशन गायकवाड, उपाध्यक्ष मनिष गोरे, अमित गायकवाड, मनिष सांगळे, गोपाल वरुळकार, राम मानकर, अभिजीत वरुडकार आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments