Ticker

6/recent/ticker-posts

द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते पिकांसाठी संजीवनी- कुलगुरू डॉ. विलास भाले



AKOLA-जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकसंख्याक राष्ट्रकडे वाटचाल करीत असलेल्या व कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेती हाच बहुतांश जनतेच्या अर्थार्जनाचा मुख्य आधार आहे,मात्र गत काही काळात विविध कारणांनी जमिनीचे आरोग्य खालावत गेले असून उत्पादकता दिवसागणिक कमी होत असल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. 

प्राप्त परिस्थितीत अधिक उत्पादनासाठी  सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही पिकासाठी संजीवनी असून द्रवरूप खताच्या माध्यमातून जरी पिकाला दिली तरी शेतकरी बांधवाना पिक उत्पादन वाढीमध्ये फरक पडण्यास मदत होईल असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न झाले त्याप्रसंगी उद्घाटन पर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 



या केंद्राच्या माध्यमातून अकोला कृषी विद्यापीठाने व्यावसायिक क्षेत्रात अजून एक पाऊल पुढे टाकले असून शेतकरी बांधवांना सुद्धा उच्चप्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास मदत होणार असल्याचे सुद्धा डॉ. भाले यांनी आपल्या मनोगतात सांगितले व शेतकरी बांधवानी द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त व खतांचा वापर करावा असे आवाहन केले. तर  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण डॉ.विलास खर्चे यांनी यावेळी बोलताना द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते मुख्य अन्नद्रव्याच्या जमिनीतून शोषणास कशी मदत करतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले  व या केंद्रातून निर्माण होणाऱ्या सर्व निविष्ठा जसे की पीडीकेव्‍ही मायक्रो ग्रेड 2 फळबाग व भाजीपाला पिकांकरिता पीडीकेव्‍ही मायक्रो ग्रेड 10 कडधान्य पिकांकरिता पीडीकेव्‍ही मायक्रो ग्रेड 11 कपाशी पिकाकरिता शेतकऱ्यांना रास्त दरात उपलब्ध करून  देण्यात असल्याचे उपस्थिताना सांगितले व वरील सर्व उत्पादने मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात उपलब्ध असल्याचे संपर्कातील शेतकरी बांधवाना कळवावे असे सुचविले. 

अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा उदघाटक म्हणून डॉ.विलास भाले तर  डॉ. विलास खर्चे संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण, डॉ. महेंद्र नागदेवे अधिष्ठाता कृषी, डॉ. प्रकाश नागरे अधिष्ठाता विद्या उद्यानविद्या, डॉ. सुधीर वडतकर अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉ. सुरेंद्र काळबांडे कुलसचिव, डॉ.प्रकाश कडू विभाग प्रमुख व डॉ. संदीप हाडोळे प्रभारी अधिकारी, हे प्रामुख्याने उपस्थित होते. अखिल भारतीय सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प मागील पंचवीस वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असून हा प्रकल्प केवळ विद्यापीठ पुरता मर्यादित नसून याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील नमुने गोळा करून सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचे पृथक्करण करून अहवाल शासनाला वेळोवेळी कळविला जात असल्याचे केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले. याप्रसंगी बोलताना विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कडू यांनी गेल्या पंचवीस वर्षाचा लेखाजोखा लक्षात घेता  संशोधनानंतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांद्वारे, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची जनजागृती करणे, शेती दिन मिळावे, आकाशवाणीच्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांना प्रबोधन करणे इत्यादी कामे या प्रकल्पामार्फत मागील 25 वर्षांपासून सुरु असल्याचे सांगितले व त्याचबरोबर विद्यापिठात असलेले प्रकल्प यांचे सुद्धा  मृदा पृथक्करण करून देणे तसेच पदव्युत्तर शाखेशी संबंधित  विद्यार्थी वर्गाचे प्रयोगांसाठी  सुद्धा माती, पाणी व  वनस्पतींचे नमुन्यांचे पृथक्‍करण करून दिले जाते याविषयी अवगत केले. व या सर्वांचा बाबी लक्षात घेता व शेतीचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची  आर्थिक स्थिती सुधारासाठी काळाची गरज लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून संशोधन संचालक व विस्तार शिक्षण डॉ.विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश कडू यांच्या सहकार्याने सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य निर्मिती केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याचे उदगार काढले.

  या प्रसंगी सुक्ष्म अन्नद्रव्य प्रकल्पात मागील पंचवीस वर्षापासून ज्या शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी भरीव योगदान दिले त्यांचा सत्कार मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता  विभागातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत सरप यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुरज लाखे यांनी केले.

Post a Comment

0 Comments