Ticker

6/recent/ticker-posts

अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त ७५ कुटुंब प्रमुखांनी घेतले ७५ वृक्ष दत्तक




युवकांनी पुढाकार घेऊन भयमुक्त, धैर्यवान, सामर्थ्यवान व बलशाली समाजासाठी कार्य करावे -डॉ अशोक ओळंबे

अकोला:-स्थानिक शिवसेना वसाहत प्र क्र १८ येथील युवकांनी अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त ७५ विविध जातीचे वृक्ष नागरिकांना दत्तक दिली असून ती जगविण्याची जबाबदारी यावेळी नागरिकांनी घेतली.



गेली २ वर्षांपासून सम्पूर्ण जगात व आपल्या भारतात कोविड १९ चा वाढता संसर्ग व रुग्णांची मोठी संख्या पाहता प्रत्येक हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन ची प्रचंड टंचाई झाली होती,रुग्णांना पैसे देऊन सुध्धा प्राणवायू मिळत नव्हता त्यामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष दत्तक घ्यावे अशी विंनती ह्यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी नागरिकांना केली,तसेच प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टचार बोकाळात असून भ्रष्ट।चार हा शिष्ट।चार होत आहे,आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबल्या जात आहे.


 त्यामुळे शहरात व जिल्ह्यात करोडो रुपयांची कामे झाले असून काही रस्त्यांची कामे बंद आहेत तर कॉंग्रीट झालेले रस्ते २वर्षात प्रचंड प्रमाणात खराब झाली आहेत त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात जात आहे ह्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन अमृतमोहोत्सवी वर्षात संकल्प करून स्वस्छ,भ्रष्टचार मुक्त,दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वासाठी तैयार रहावे असे आव्हान यावेळी युवकांना केले.कार्यक्रमाचे आयोजन सागर पोलाखडे यांनी केले होते यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,सामाजिक कार्यकर्ते गणेश पोलाखडे,गणेश मानकर,महादेवराव बोरकर,प्रमोद मराठे,श्रावण धरपवार,दीपक निकामे,सचिन बोरेकर,गणेश श्रीनाथ,विजय चाटी, सागर पोलाखडे,विक्की इतवारे, साहिल दोरकर,विक्की पांडे,आकाश सरंजसे, गोपाळ चाटी,शैलेश इंगळे,गोपाल चांदणे,सागर पचपोर,आकाश पांडे,सुनील पोलाखडे,आशु तिवारी,रामभाऊ ठाकरे,संतोष पोंदे, सुरेश धारपवार,एकनाथ ढवळे यांचेसह प्रभाग क्र १८ मधील महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments