Ticker

6/recent/ticker-posts

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; आता वस्ती तिथे लसीकरण



पुणे | पुणे महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता पुणे महानगरपालिकेने लसीकरणासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


लसीकरण मोहिमेत अनेक नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांचे लसीकरण रखडले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून, 'वस्ती तिथे लसीकरण' ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यामुळे शहरातील अशिक्षित, तंत्रज्ञानाची माहिती नसणाऱ्या व झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे लसीकरण थेट त्यांच्या वस्तीत जाऊन करण्यात येणार आहे.


यामुळे नागरिकांना लस घेण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही. महानगरपालिका क्षेत्रातील एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments