Ticker

6/recent/ticker-posts

दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी; केंद्र सरकारची माहिती

From Pixabay


मुंबई | कोरोना महामारीने गेल्या वर्षांपासून जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तर गंभीर परिणाम दिसून आले. यात अनेकांचे कुटूंब उध्वस्त झाले, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर उपासमारीची, आत्महत्या करण्याची वेळ आली. 


आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. परंतू कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. अशातच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता शासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.


गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणाचे विविध टप्पे सुरू असतानांच, अनेकांचा लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर काहींचा अजूनही याला नकार आहे.


भारतात सध्या 20 टक्के लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या भारतात दररोज सुमारे 50 लाख नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संदर्भात नवी माहिती दिली आहे.


केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लसीचा दोन्ही डोस घेतल्यानंतर, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 98 टक्क्यांनी कमी होते तर, एका डोसमधून सुमारे 92 टक्के बचाव होतो. 


सध्या भारतात कोवाॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक वी या तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच अन्य देशांच्याही लसींना देशात मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे.


कोरोनाची येणारी तिसरी लाट आटोक्यात येण्यासाठी, लसीकरण मोहिम गतीने होण्याची गरज आहे. त्यामुळे किमान 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे केंद्राकडून सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments