Ticker

6/recent/ticker-posts

महिला बचत गट कार्यशाळेचे आयोजन






कंचनपुर : जिल्ह्यातील कंचनपूर येथे काल नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा अंतर्गत लघुउद्योगाकरिता महिला बचत गटांची कार्यशाळा घेण्यात आली.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उमेद अभियान जिल्हा महाव्यवस्थापक गजानन महल्ले सर, तसेच तालुका समन्वयक संदेश जी मस्के सर, गट समूह सौ आरती ताई उकळकर, पोखरा गट समन्वयक आरती पराळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाट, ग्रामसेवक अरविंद शिंदे, गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद भाऊ चौरे, राजेश भाऊ शेळके, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शेगोकार सर, महेश भाऊ चौरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण भाऊ उपस्थित होते. 


या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकन्या ताई शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शिवशंकर पाटील डिक्कर उपसरपंच तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन गावातील सी आर पी ज्योती ताई डिक्कर यांनी केले.


तसेच गावातील 14 गटाचे अध्यक्ष व सचिव या कार्यक्रमाला हजर होते. तसेच या निमित्त वृक्षारोपण सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत औषध गोळ्या सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आल्या. लघु उद्योगा बद्दल मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments