Ticker

6/recent/ticker-posts

आळंदीच्या नगराध्यक्षांसह वारकरी कोरोना पॉझिटिव्ह; वाचा सविस्तर..



पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच शासनाकडून बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्व वारक-यांची आरटीपीसीआर चाचणी देखील करण्यात आली आहे. 


त्याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान सर्वांना करण्यात आले आहे. यादरम्यान, देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच एक चिंताजनक बाब पुढे आली आहे. ती म्हणजे आता आषाढी वारीत कोरोनाने शिरकाव केल्याचे सांगितले जात आहे.


आषाढी वारीसाठी आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आज होणार आहे. या प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या 368 वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. 


मात्र, त्यातील 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी 22 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यात आणखी 15 जणांची भर पडल्याची माहिती, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिली आहे.


मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकणार आहेत. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्याठिकाणी इतरांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच वारक-यांना आणि जनतेला केले आहे. 


यापूर्वी देखील सरकारकडून, वारीला पायी जाण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. कारण पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो आणि संसर्ग वाढू शकतो. आता हीच चिंता खरी ठरतांना दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments