Ticker

6/recent/ticker-posts

दिलीप कुमार यांचे दुःखद निधन

From Facebook

From Facebook


मुंबई | अभिनयाच्या सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुःखद निधनाने चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या लाखो करोडो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तब्बल पाच दशकं आपल्या जबरदस्त अभिनयाने बाॅलिवूड गाजवणारे ते एक उमदा अभिनेते होते. 


मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


जवळ जवळ 50 वर्ष त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.


दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर, 1922 साली पाकिस्तानात येथे झाला. फाळणीनंतर त्यांच्या परिवाराने भारतात येणे पसंत केले. दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. 


1940 मध्ये त्यांनी पुण्यातील एका कँटीनचे मालक व फळविक्रेते म्हणून काम सुरू केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.


1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. ज्वारा भाटा चित्रपटाचे लेखक भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे युसुफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार केले आणि तेव्हापासून ते दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. 


मात्र ‘ज्वार भाटा’ हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. बाॅलिवूड प्रदार्पण केल्यानंतर त्यांनी जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत अशा अनेक चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांची ओळख संपुर्ण भारतात ट्रॅजेडी किंग म्हणून झाली.


सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमार यांना मिळाला होता. दिलीप कुमार राज्यसभेचे सदस्य होते. 1994 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 


तसेच त्यांना पाकिस्तानातील सर्वात मोठा पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ने देखील सन्मानित करण्यात आले होते. हिंदी सिनेसृष्टीत सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त करण्यात त्यांनी विश्‍वविक्रम नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments