Ticker

6/recent/ticker-posts

ही नवी लस भारतात मिळणार मोफत

From Pixabay


मुंबई | कोरोनाच्या सध्या सुरू असलेल्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने देशात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आणि लवकरच येणा-या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशभरात वेगाने लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.


सध्या भारतात फक्त कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या मोफत वितरणाला शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, रशियाच्या स्पुटनिक-वी या लसीच्या वितरणासाठी देखील देशात परवानगी देण्यात आली आहे. 


कारण स्पुटनिक-वी ही लस भारतातच तयार होणार असल्याने, आता देशाची चिंता दूर झाली आहे. त्यामुळे रशियाची स्पुटनिक-वी लस आता भारतात मोफत मिळणार आहे. 


सध्याच्या परिस्थितीत ही लस केवळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. परंतू लवकरच सरकारद्वारे या लसीचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे ही लस मोफत लसीकरण मोहिमेतून सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा यांनी दिली आहे. 


पोलिओच्या लसीकरणामुळे काही भागात कोरोना लसीकरण हे सध्या कासव गतीने सुरू आहे. परंतू पुढील आठवड्यापासून ही मोहिम वेगाने सुरू होईल. 


त्यानुसार, जुलैच्या अखेरीस 12 ते 16 कोटी डोस मिळणार आहे. जानेवारीतच केंद्राने जुलैपर्यंत 50 कोटी डोस देण्यात येतील, असं सांगितलं आहे. आजवर 34 कोटी लसी व्यक्तींना टोचण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील डाॅ. अरोरा यांनी दिली आहे. 


त्याचबरोबर पोलिओ प्रमाणे ग्रामीण भागात देखील ही लस पोहचवली जाणार आहे. स्पुटनिक-वी लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments