Ticker

6/recent/ticker-posts

शाळेची घंटा पुन्हा वाजणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय



मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून देशातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्यातही तीच परिस्थिती असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर रहावे लागले आहे. 


ऑनलाईन शिक्षण जरी सुरू असले तरी शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणपद्धती फायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांसह, पालकांनाही पडला आहे.


अशातच शाळेसंबंधी राज्य सरकारकडून आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


त्यामुळे शाळा कधी सुरू होणार या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना आता दिलासा मिळणार आहे. 


महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच जे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये शाळेची घंटा वाजणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.


राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा ऐवढ्या प्रदीर्घ काळानंतर शाळेत जाण्याची उत्सुकता लागली आहे. परंतू कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा भितीचे सावट निर्माण झाल्याने, शाळा सुरू झाल्यावर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments