Ticker

6/recent/ticker-posts

सैराट फेम तानाजीचं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल..



मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील 'सैराट' चित्रपटाने फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर देखील कमालीची भुरळ घातली. त्यातील कलाकारांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. 


यानंतर या चित्रपटातील अनेक कलाकारांनी दुसऱ्या चित्रपटात काम केले. त्यातील काही चित्रपट गाजले तर काही चित्रपट फ्लाॅप झाले. पण या कलाकारांना सोशल मीडियावर अजूनही चांगलीच प्रसिद्धी मिळते आहे. 


त्यातीलच एक कलाकार म्हणजे तानाजी गालगुंडे. सोशल मीडियावर तानाजीने यावेळी आपल्या नव्या फोटोशूटमुळे प्रचंड धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. 




आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावणारा तानाजी, सध्या आपल्या एका न्यूड फोटोशूट मुळे चर्चेत आहे. तानाजीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो न्युड उभा आहे. तर त्याच्या दोन्ही हातात गिटार आहे. रावण फिचरच्या पेजने तानाजीचा हा फोटो शेअर केला आहे.


माझे पाय जरी योग्य रचनेत नसले तरी माझे संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.


आपण अनेकदा शरिराने अपंगत्व असणाऱ्या किंवा शारिरीकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तींची खिल्ली उडवत असतो. त्यामुळेशारिरिक सकारात्मकता सांगण्याचा प्रयत्न या फोटोमधून करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments