Ticker

6/recent/ticker-posts

सीतेच्या भूमिकेसाठी जास्त पैसे मागितल्याने करिना झाली ट्रोल.. मात्र तापसीची पाठराखण

From Facebook


मुंबई | बाॅलिवूडमधील खान बेगम म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर उर्फ बेबो सोशल माध्यमांमधील एक असलेल्या ट्विटरवर चांगलीच ट्रोल झाली होती. 


सीतेच्या भूमिकेसाठी करिनाने चक्क 12 कोटी रूपये मागितल्याची चर्चा होत होती. त्यानंतर अनेकांकडून सीतेच्या भूमिकेसाठी करिना ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घ्या, अशा कमेंट्स करण्यात आल्या होत्या. यात करिना चांगलीच ट्रोल झाल्याचे दिसून आले. 


अशातच अभिनेत्री तापसी हिने करीनाची पाठराखण करत, तिने केलेली मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.


एका मुलाखतीत तापसीने, करीना ही देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक असल्याचे म्हटले आहे. ती जास्त मानधन मागत असेल, तर तिचे काम तसे असून पौराणिक चित्रपटात भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात, असं तुम्हाला वाटतं का?, असा सवाल करत मला तरी असं वाटतं नाही म्हणत, करिनाची पाठराखण केली. 


पुढे तापसी म्हणाली, एखाद्या हिरोने फी वाढवली की कोणाला काहीही फरक पडत नाही. त्याच्यावर कोणीच टीका करत नाही, मात्र एखाद्या हिरोईनने फी वाढवली की, तिच्यावर टीका सुरू होते. 


करीना कपूर ही बाॅलिवूडमधील अनेक प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. हिरोची फी वाढली असती तर ‘इसकी मार्केट व्हॅल्यू बढ गयी है’ म्हणत, ते सर्वांनी स्वीकारलं असतं मात्र हिरोईनने विशिष्ट रकमेची मागणी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून एका महिलेने विशिष्ट मानधनाची मागणी का करू नये? असा सवाल तापसीने केला आहे.

Post a Comment

0 Comments