Ticker

6/recent/ticker-posts

पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अविनाश पोळ सरांचा चिखलदरा दौरा







चिखलदरा  पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अविनाश पोळ   सरांनी मोथा गावाला भेट दिली. प्रथमता प्रगतशील युवा शेतकरी गजानन भाऊ शनवारे यांच्या शेतामधील स्ट्रॉबेरी, भेंडी, भात आणि पट्टा पद्धतीने पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. सोबतच पाणी फाउंडेशननी सांगितल्या प्रमाणे पेरणी केलेल्या इतर शेतकऱ्यांसोबत ही चर्चा केली. 


त्यामध्ये सोयाबीनचे पुढील नियोजन कसे? करायचे ते सांगितले, जसे की सापळा पिके मका, सूर्यफूल, बांधावर एरंड, लागवड व त्यापासून होणारा दुहेरी फायदा लक्षात आणून दिला. त्याचबरोबर गजानन भाऊंनी बनवलेले रेनगेज व नोंदवही तसेच सोयाबीन पिकाची निरीक्षण नोंदवही बघितली.व साधुराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी करून मुरघास बनवण्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.


त्यानंतर खादी ग्रामोद्योगाच्या खवा उद्योगाला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर सभागृहात बसलेल्या सर्व गावकऱ्यांना सरांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये गाव समृद्ध करण्यासाठी स्पर्धेचे सहा स्तंभ, व त्याला मनरेगाची जोड देऊन आपण कसा?फायदा करून घेऊ शकतो ते वेगवेगळी उदा. देऊन समजावून दिले.


त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक माननीय तहसीलदार माने मॅडम BDO प्रकाश पोळ सर यांच्या उपस्थितीत तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक यांना मार्गदर्शन करताना सरांनी नेहमीप्रमाणेच आपल्या दिमाखदार शैलीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच तालुक्यातील गावांना असणाऱ्या इतर अडचणी जाणून घेतल्या.


त्यामधीलंच एक म्हणजे POCRA मधील काही गावांना अनुदानाचे पैसे मिळाले नाही. त्यासाठी सरांनी POCRA चे प्रमुख कोळेकर सरांना कॉल करून याविषयी चर्चा केली कोळेकर सरांनी सुद्धा आपण लवकरात लवकर ह्या अडचणी मार्गी लावू असा विश्वास दिला.


      खरोखरंच डॉ. साहेबांच्या चिखलदरा दौऱ्यामुळे तालुक्याला एक नवी ऊर्जा, स्फूर्ती मिळून एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments