Ticker

6/recent/ticker-posts

जून महिन्यात रत्नागिरीतील तब्बल इतकी मुलं कोरोनाच्या विळख्यात

From Pixabay


रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच आलेल्या दुस-या लाटेत अनेक लहान मुलांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.


काही तज्ञांकडून कोरोनाच्या येणा-या तिस-या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतू कोरोनाची तिसरी लाट येण्याआधीच, लहान मुलांना कोरोना झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


जून महिन्यात कोरोना झालेल्या लहान मुलांचा आकडा तब्बल 1176 आहे. ही सर्व बालके 14 वर्षाच्या आतील वयोगटाची आहेत. ही बालके बाधित होण्याचे प्रमाण 6.44 टक्के एवढे आहे.


चिंतेची बाब अशी की, रत्नागिरीत दर दिवशी 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळून येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6102 ॲक्टिव्ह रुग्ण असून, पॉझिटिव्हीटी रेट हा 7.87 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 2.86 टक्के असून रिकव्हरी रेट हा 87.97 टक्के आहे.

Post a Comment

0 Comments