Ticker

6/recent/ticker-posts

रिंकू राजगुरुचा वर्कआऊट लूक बघून चाहते घायाळ




मुंबई | नागराज मंजूळे निर्मित सैराट या चित्रपटातून आर्चीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु अल्पावधीतच मराठी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. 


त्यानंतर तिने कागर, मेकअप या मराठी चित्रपटांमध्ये आणि हिंदी वेब सिरीजमध्ये देखिल काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहे. त्याचबरोबर ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. 


नुकतेच तिने आपल्या इंस्टा प्रोफाईलवर आपल्या वर्कआऊटचे फोटो अपलोड केले असून, ते प्रचंड व्हायरल झाले आहे.


या फोटोला रिंकुने सुंदर असं कॅप्शन देखील दिले आहे. काही चाहत्यांनी तीने वर्कआऊट करतांना बाॅडी शो ऑफ केल्याबद्दल रिंकुला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिच्या जबरदस्त फिगरची स्तुती केली आहे. 


विशेष म्हणजे आपली फिगर दाखवण्यासाठी रिंकुने बोल्ड अशी शाॅर्ट पँट आणि स्पोर्ट्स टि-शर्ट घातला आहे.


रिंकुच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम देत मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकूने आपल्या पुढच्या वाटचालीसाठी फिटनेसकडे लक्ष देणे सुरू केले आहे. 


योग्य आहार आणि व्यायामाच्या जोडीने तिने स्वतःमध्ये चांगलाच बदल केला आहे. आजवर रिंकुने फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर कन्नड, बाॅलिवुड आणि वेबसिरीजमध्ये देखिल तिच्या अभिनयाने वेगळी छाप उमटवली आहे.


नुकतंच तिने लंडनमध्ये ‘छुमंतर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण केले आहे.


https://www.instagram.com/p/CQ73sr-pE6W/?utm_medium=copy_link

Post a Comment

0 Comments