Ticker

6/recent/ticker-posts

क्रिकेटनंतर हरभजन सिंगची आता चित्रपटात एंट्री

From Facebook


मुंबई | दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच हरभजन याचे रुपेरी पडद्यावर पदार्पण होणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून हरभजन आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. क्रिकेटच्या मैदानात आपली कर्तबगारी दाखविल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने, हरभजन चे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.


तामिळ चित्रपट असलेल्या ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाद्वारे हरभजन सिंग ची अभिनय क्षेत्रातील वाटचाल सुरू होणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे. 


हरभजन सिंग आणि लोसलिया यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजन पॅकेज असणार आहे. निर्मात्यांनी हरभजन आणि त्याच्या मित्रांसोबत एक आकर्षक पोस्टर आणि लिरिकल व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.


किरण रेड्डी मंडाडी आणि राम माद्दुकुरी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट यावर्षी हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments