Ticker

6/recent/ticker-posts

एकनाथ खडसेंना भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी सर्वात मोठा दणका



मुंबई | राष्ट्रवादीचे नेत्यांवर एका पाठोपाठ संकटे कोसळल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव समाविष्ट झाले आहे. 


नुकतीच एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ही अटक झाली आहे. 


रात्री केल्या गेलेल्या कसून चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना अटक झाल्याने खडसेंना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असतांना, त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 


त्यावेळी 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची केवळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.


यावेळी आपली बाजू मांडतांना खडसे यांनी, एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या जमिनीबाबत माझा व्यवहार झालेला नाही.


उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने व्यवहार करू नयेत का? 


समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसेंनी केला होता.

Post a Comment

0 Comments