Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात वाढला या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट, पुन्हा कडक लॉकडाऊन

From Pixabay




सातारा | देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होतांना दिसून येत आहे. 


त्यामुळे शासनाकडून काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध काही प्रमाणात कडक करण्यात आले आहेत.


अशातच सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने, या जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश झाला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 789 नवे रुग्ण सापडले असून त्यातील 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 


जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4666 जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर 7774 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या सातारा जिल्ह्यात आहेत.


या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांसाठी दुकानांची वेळ सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून ही माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments