Ticker

6/recent/ticker-posts

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा!

From Facebook


मुंबई | आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 

एमपीएससीचा मुद्दा उफाळून वर आला. एमपीएससी उमेदवार असलेल्या स्वप्नील लोणकर या तरूणाच्या आत्महत्येनंतर, आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला. 


स्वप्नील लोणकर यांच्या कुटुबीयांना 50 लाख रूपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे.


एमपीएससीच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना अजित पवार यांनी ही घोषणा केली. विरोधकांकडून एमपीएससीच्या मुद्द्यावर गदारोळ घातल्यानंतर 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.


तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुद्द्यावरून आणि स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने निराश होऊन केलेल्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, फक्त दोन दिवस चालणारे हे पावसाळी अधिवेशन कितपत वादळी भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments