Ticker

6/recent/ticker-posts

70 वर्षीय आजीच्या डोळ्यांची दृष्टी कोरोनामुळे आली परत



वाशिम | कोरोनाने आधीच देशभरात भीतीचे आणि धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे, आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 


या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, शासनाकडून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र काही लोकांची अजूनही लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येतांना दिसून येत आहे.


अशातच वाशिममधील एका आजीने कोरोना लस घेतल्यानंतर, आपल्या डोळ्यांची दृष्टी परत आल्याचा दावा केला आहे. वाशिममधील रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवाई असे या 70 वर्षीय आजीचे नाव आहे.


या आजीला मोतीबिंदू झाल्याने गेल्या नऊ वर्षापूर्वी त्यांनी आपली दृष्टी गमावली होती. सध्या लसीकरण मोहिम सुरू असल्याने, त्यांनी रिसोड येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेतला होता.


मात्र, आता या आजीला दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागले असल्याचे, या आजीकडून सांगण्यात येत आहे.


लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या या वातावरणात 70 वर्षीय आजींची दृष्टी परत आल्याने, लस पूर्णपणे सुरक्षीत आहे, असं डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments