Ticker

6/recent/ticker-posts

12 दिवसाच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; कुटूंब हादरले

From Pixabay


नागपूर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक कुटूंब उध्वस्त झालीत. सध्या कोरोनाची सुरू असलेली दुसरी लाट जरी ओसरत असली, तरी आलेल्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. 


अशातच नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे. ह्रदय पिळवून टाकणा-या या घटनेत, अवघ्या 12 दिवसाच्या बाळाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे अनेकांचे मन सुन्न झाले आहे. 


या बाळाचा जन्म 20 जून रोजी झाला होता. या बाळाच्या जन्मानंतर त्याला सहा दिवसांनी ताप आल्याने, त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात बाळाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता.


बाळासोबत त्याच्या आईची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र आई निगेटिव्ह आली होती. या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 


परंतू दुर्दैवाने या बाळाचा उपचारादरम्यान 2 जुलै रोजी मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही गोष्टींचा देखील त्रास होता. 


या बाळाचे हृदय योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, बाळाची जन्मल्याच्या बाराव्याच दिवशी प्राणजोत मालावली. त्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments