Ticker

6/recent/ticker-posts

रखडलेले काम लवकरच सुरू होणार -डॉ अशोक ओळंबे

 महामार्ग अकोला ते अकोट (बैतुल महामार्ग क्र १६१ )



अकोला-अकोट-अंजनगाव -परतवाडा-बैतुल महामार्ग क्र १६१ चे निर्मान कार्य २०१७ पासून सुरू आहे त्यापैकी अकोला ते आकोट हा मार्ग अपूर्ण असून ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे व निर्माण कार्य संथ गतीने,कधी चालू कधी बंद,अश्या अवस्थेत असल्यामुळे  वाहन धारकांना अत्यंत त्रास होत आहे,हा महामार्ग अकोला लोकसभा क्षेत्रातील अकोला पूर्व विधानसभा मतदार संघ,व अकोट विधानसभा मतदार संघ या दोन मतदार संघामधून जात असून दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे,

तसेच महाराष्ट्रात नावलौकिक असलेला व संपूर्ण महिनाभर चालणारा कावड व पालखी  उत्सवाचा महत्वपूर्ण मार्ग आहे श्रावण महिन्यात महिनाभर या रस्त्याने पायदळ कावड व पालखी निघत असून शिवभक्तांची सारखी वर्दळ अकोला ते गांधीग्राम व अकोट ते गांधीग्राम या मार्गाने होत असते,निर्माण कार्य अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून बऱ्याच नागरिकांना आपले प्राण सुध्धा गमवावे लागले आहेत हा मार्ग तात्काळ पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी तसेच शिवभक्तांनी महामार्ग अधिकारी व जनप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने दिली असून कुठलीही ठोस कार्यवाही तसेच रस्त्याच्या कामाला गती आलेली नाही.

अश्या आशयाचे निवेदन १२/६/२०२१ रोजी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री मा ना नितीनजी गडकरी साहेब यांना देण्यात आले असता त्यांनी तात्काळ महामार्गाचे निर्माण कार्य सुरू करण्याचे संबधीत अधिकाऱ्यांना आदेश दिले.त्यामुळे आगामी काळात लवकरच महामार्ग १६१ अकोला अकोट रस्त्याचे निर्माण कार्याचा मार्ग मोकळा झाल्याचे डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले.

यावेळी "अंबा नगरी अमरावती ते संत नगरी शेगाव" करिता शेतकरी,व्यापारी वर्ग,वारकरी मंडळी तसेच कामगार व कर्मचारी यांची असुविधा होत असल्यामुळे,व आरक्षण असेलच तरच प्रवास हे धोरण रेल्वे प्रशासनाने असल्यामुळे पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला,वाशीम,बुलढाणा येथील नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो ट्रेन सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

तसेच वाडेगावं ते शेगाव पालखी मार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी  मा आ नारायणराव गव्हाणकर यांनी निवेदन देऊन चर्चा केली,यावेळी मा आ नारायणराव गव्हाणकर,भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे ,राजेंद्रजी टाकळकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments