Ticker

6/recent/ticker-posts

भाजपने ओबीसीच्या आरक्षणाबद्दल आक्रोश आंदोलन केल्यापेक्षा केंद्र सरकारला ओबीसीच्या जनगणनेची मागणी करावी - ओबीसी महासंघ



अकोला  भाजपाच्या ओबीसी सेल/ मोर्चाने महाराष्ट्रातील ओ.बी.सींच्या राजकीय आरक्षणाबाबत प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले हा निव्वळ ढोंगीपणा असुन भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रामध्ये असून महाराष्ट्रातील भाजपाच्या ओबीसी मोर्चाने आक्रोश आंदोलन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारला ओबीसीच्या जनगणनेची मागणी करावी असे आवाहन ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड आणि कार्याध्यक्ष अॅड. संतोष राहाटे यांनी केले आहे तसेच जिल्ह्यात आक्रोश आंदोलन करण्यापेक्षा भाजपाच्या केंद्रीय कार्यालयासमोर करावे अशी टिका सुद्धा ओबीसी महासंघाच्या बैठकीत केली.

    काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओ.बी.सी.चे आरक्षण रद्द करुन त्यांच्यावर गदा आणली आहे. यासंदर्भात ओ.बी.सी. महासंघ महाराष्ट्र राज्याची बैठक पार पडली असता या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली.

 यावेळी भारतीय जनता पक्षाने तसेच त्यांच्या ओ.बी.सी. विभागासह भाजपा मोर्चाने ३ जुन रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश आंदोलन केले खरे परंतु केंद्र सरकारने जर महाराष्ट्र राज्यातील ओ.बी.सी.ची जनगणना केली तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटु शकतो त्यामुळे भाजपातील कार्यरत ओबीसी बांधवांनी तसेच ओबीसी सेल / मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता जिल्ह्यात आक्रोश आंदोलन करण्यापेक्षा भाजपाच्या मुख्य कार्यालयासमोर करावे व महाराष्ट्रातील ओबीसींच्या जनगणनेची व जनगणनेमध्ये ओबीसींच्या काॅलमची मागणी केंद्र सरकारकडे करावी. असे आवाहन ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केले.

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता ओबीसी महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे सुद्धा या बैठकीत ठरविण्यात आले. ओबीसी महासंघाच्या झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, कार्याध्यक्ष अॅड संतोष राहाटे, नगरसेविका किरणताई बोराखडे, निलेश उन्हाळे, गोपाल राऊत, संजय बावणे, मुस्ताक शहा, प्रदीप मांगुळकर, संतोष पंडित, भारत घाटोळ, गणेश चोंडेकर, संतोष वनवे, ज्ञानेश्वर तारापुरे, सुभाष नवथळे, जनार्दन सहारे, शिवशंकर वंजारे, मनोहर पंजवानी, शुभम डहाके, गोपाल ढोरे, नागेश घोगरे, प्रल्हाद पाचपोर, अनंतराव अवचार, प्रकाश उगले,‌अॅड. सदगुरु निवाणे, संजय जुमडे यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments