Ticker

6/recent/ticker-posts

तुमचे हिंदी भाषेवर प्रभुत्व असेल तर या नोकरीच्या संधी तुमची वाट पाहत आहेत

jobs for hindi language


अधिकृतपणे राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त नसला तरीही हिंदी हि देशात सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के नागरिक हिंदीचा वापर करतात. शासकीय व्यवहारातही हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. 

 

बॉलीवूड असो कि इतर कोणतेही क्षेत्र हिंदीचा बोलबाला आहे. यामुळेच हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी देखील तितक्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र योग्य माहिती अभावी अनेकदा आपल्याला योग्य मार्ग निवडता येत नाही. चला तर मग जाणून घेऊ...जगातील दुसऱ्या क्रमांकाची बोलल्या जाणारी भाषा हिंदी आहे. एका अहवालानुसार सध्या जगभरात हिंदी भाषिकांची संख्या 55 कोटींपेक्षा जास्त आहे, तर हिंदी समजू शकणार्‍या लोकांची संख्या 1 अब्जाहून अधिक आहे. त्यामुळेच या क्षेत्रात आता नोकरीच्या संधी खुणावत आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंच आणि संस्थांमध्ये हिंदीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.

 


फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि WhatsApp सारख्या समाजमाध्यमांवरही हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन  सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत हिंदी भाषेत करिअरची शक्यता वाढली आहे.

hindi teacher


हिंदी अध्यापनाची संधी
हिंदी भाषेचे अध्यापन करणे हा एक उत्तम पर्याय या भाषेवर पकड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उच्च शैक्षणिक संस्था ते प्राथमिक स्तरापर्यंत अध्यापनाच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याला सदाहरित करियर मानले जाते.


वेळोवेळी घेण्यात येणार्‍या 'राष्ट्रीय पात्रता चाचणी' (नेट) तसेच या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविणा्यांना 'कनिष्ठ संशोधन फेलोशिप' (जेआरएफ) मिळू शकते. ज्याद्वारे संशोधन कार्य (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक म्हणून नियुक्तीची संधी मिळू शकते.


हिंदी अधिकृत भाषा अधिकारी

प्रामुख्याने केंद्र सरकारच्या विविध विभागांची कार्यालये, मध्यवर्ती संस्था येथे हिंदी अधिकृत भाषा अधिकारी नेमले जातात जे शासकीय कामकाजात हिंदीच्या वापरासाठी महत्व देतात तसेच त्यासाठी समन्वय साधून मदत करतात.

जर आपण हिंदीमध्ये पदवीधर असाल आणि इंग्रजी विषय देखील आपल्या पाठ्यक्रमात असेल तर अधिकृत भाषा अधिकारी म्हणून करिअर बनवता येते. वेळोवेळी या पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होतात. योग्य तयारी करून आपण या पदासाठी अर्ज केल्यास आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते.हिंदी पत्रकारिता क्षेत्रात गुणवंतांना संधी

हिंदी शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता हा एक आकर्षक पर्याय उपलब्ध आहे. या क्षेत्रात हिंदी भाषा, लिखाण, संभाषणावर प्रभुत्व असेल तर येथे प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.


या क्षेत्रामध्ये मेहनती व  प्रतिभावान तरुणाईसाठी बर्‍याच संधी आहेत. या काळात हिंदी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांव्यतिरिक्त बरीच हिंदी वाहिन्या आणि मासिके हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी आपले करियर घडविण्यासाठी उपलब्ध आहेत. गेल्या काही काळात युट्युब व इतर समाज माध्यमांची लोकप्रियता वाढली असल्याने स्थानिक पातळीवरही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.


radio jockey


 रेडिओ  आणि बातमी वाचक

 
आपल्या देशात रेडिओ निवेदक अमीन सयानीचा आवाज कोणी ऐकला नाही. नावेदचा आवाज माहिती नाही असा व्यक्ती विरळाच. त्यांनी हिंदीमध्ये रेडिओ जॉकीचे काम करून आपल्या प्रतिभेची छाप सोडली.


जर आपण भाषेवर चांगली पकड ठेवली तर आवाज चांगला असेल तर रेडिओ जॉकी हा करिअरचा चांगला पर्याय आहे. यासह, बातमी वाचक म्हणून देखील काम करता येईल. आपल्याला फक्त आपल्या स्थिर प्रभावशाली आवाजामधील बातम्या वाचून देश आणि परदेशातील घडामोडींबद्दल माहिती देणे आवश्यक असते.हिंदी अनुवादक/दुभाषी

अनुवादक म्हणून हिंदीमध्ये अत्यंत चांगली संधी आहे. केवळ शासकीय व खाजगी नोकरी म्हणूनच नाही तर व्यक्तिगत व्यवसाय म्हणून देखील या क्षेत्रात काम करता येऊ शकते. अनेक पुस्तके हिंदी भाषेमध्ये अनुवादित केल्या जात आहेत.

त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तसेच दोन वेगवेगळ्या भाषिकांमध्ये संवादाची भूमिका बजावण्यासाठी दुभाषी म्हणून देखील एक आव्हानात्मक करियर आह. अनेक देश-विदेशातील माध्यम संस्था, राजकीय संघटना, पर्यटन कंपन्या, मोठमोठी हॉटेल्स या ठिकाणी दुभाषिकांची प्रचंड मागणी असते. त्यासाठी घसघशीत वेतनही दिल्या जाते. त्यामुळे ज्यांची हिंदी चांगली आहे त्यांनी या क्षेत्राकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.हिंदीमध्ये सर्जनशील लेखन
ज्यांच्यामध्ये हिंदी भाषेच्या ज्ञानाबरोबरच लेखन कौशल्यही आहे त्यांच्यासाठी सद्यस्थितीत वेगवेगळी संकेतस्थळे, जाहिरात संस्था, माध्यमे, चित्रपट निर्मिती क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात. आपल्या लेखनाच्या दर्जानुसार आपल्याला चांगली मिळकत होऊ शकते.


लेख सौजन्य : Naukri Margadarshan

Post a Comment

0 Comments