Ticker

6/recent/ticker-posts

आपसी वादातून केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

From Pixabay


अकोला | जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात एक भयावह घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आपसी वादातून वडील आणि मुलाला बेदम मारहाण केल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. 


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबेरी येथील रहिवासी देविदास भोजने यांचा गावातील एका कुटुंबाशी आपसी वाद सुरू होता. परंतू आज पहाटे हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याने, हा वाद प्राणघातक ठरला. या वादात अंदाजे 62 वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा तीस वर्षीय मुलगा अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली. गंभीर अवस्थेत असलेल्या अजयवर अकोला येथे उपचार सुरू आहे. 


या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन देशमुख पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, प्रमिला भीमराव भोजने आदी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments