Ticker

6/recent/ticker-posts

एकाची नजर मुंबई वर, तर दुस-याची बारामतीवर, जनता वा-यावर



अकोला | कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांसोबत प्रशासनाचे सहकार्य देखील तितकेच मोलाचे आहे. परंतू येथील सरकारचं मात्र राज्याकडे लक्ष नसल्याचं सांगत, राज्य सरकारवर टिका करण्यात आली आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही टीका केली आहे. या टिकेत, 'एकाचं मुंबई तर दुसऱ्याचं बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे,' असा उल्लेख त्यांनी केला आहे. 


यादरम्यान, कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात राज्यातील आपातकालीन व्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नसून, यात त्यांना अपयश आले आहे. येणा-या तिस-या लाटेचा धोका हाताळण्यासाठी ज्या उपाय योजना करायला हव्या, त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे.  असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.


अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी राज्य सरकारबाबत निराशा व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला. सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या या बळकट करायला हव्या. 


त्यामुळे नागरिकांची उपाचारासाठी व आपत्कालीन गैरसोय होणार नाही, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला.

Post a Comment

0 Comments