Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील कोरोनामुक्त गावाबद्दल तुम्ही ऐकलं का?

सर्वांनी आदर्श घ्यावा...असं गावं




अकोला | कोरोना महामारीने आधीच सर्वजण त्रस्त असतांना आलेल्या एका सकारात्मक बातमीने, या गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगायची बाब म्हणजे, या गावाने कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. महाराष्ट्रातील या एकमेव कोरोनामुक्त गावाचा सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे. 


बहिरखेड असं या गावाचं नाव. अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी तालुक्यात येणा-या या गावाने आपल्या गावातील सर्वांनाच कोरोनापासून लांब ठेवलं आहे. 


कोरोना महामारीची भिषण परिस्थिती लक्षात घेता, बहिरखेड गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेविका आणि गावकऱ्यांनी एकत्र पुढाकार घेऊन कोरोनाच्या सुरुवातीलाच गावबंदी केली. त्याचबरोबर रस्ते, रिक्षा बंद करून, संपूर्ण गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझरची फवारणी केली.


कोरोना हा आपल्या गावात येऊ नये, म्हणून गावातील लोकांनी देखील तशी खबरदारी घेतली. सरंपचांनी सांगितलेल्या नियमांचं पालन केलं.


या गावात अजुन एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. त्याचे कारण म्हणजे, गावातील कुणालाही बाहेरगावी जाऊ न देणे, बाहेरगावचा व्यक्ती गावात येऊ न देणे आणि जर कोणी आलंच तर त्याला 15 दिवस गावाबाहेर विलगीकरणात ठेवणे, असे नियम आखून घेत, त्याचे पालनही केले. त्याचबरोबर गावातील वयोवृद्ध लोकांच्या बैठकांवर बंदी घातली, गावात फिजिकल डिस्टन्सिंग, घरा-घरामध्ये सॅनिटायझरचा वापर केला.


परिणामी, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments