Ticker

6/recent/ticker-posts

अखेर ग्रामीण रुग्णालयाला मिळाली ऍम्बुलन्स



आ.प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या तर्फे अजून 5 ऍम्ब्युलन्स मिळणार


भाजयुमो च्या पाठपुराव्यामुळे प्रकरण लागले मार्गी


अकोट- काही दिवसांआधी 108 च्या खराब ऍम्ब्युलन्स मुळे तालुक्यातील एका युवकाला प्राण गमवावा लागला होता ही अतिशय शर्मेची आणि निंदनीय बाब आहे परंतु प्रकरणाचं गांभीर्य समजून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी व नवीन ऍम्ब्युलन्स ची मागणी भाजप अकोला जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,अकोट चे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख यांचा नेतृत्वात जिल्हा प्रशासनाकडे भाजयुमो ने केली होती त्या संदर्भात पाठपुरावा करत आज अकोट ग्रामीण रुग्णालयाला एक नवीन ऍम्ब्युलन्स जिल्हा प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.

सध्याची परिस्थिती बघता ही एक ऍम्ब्युलन्स आपली सेवा योग्य रित्या पुरवू शकणार नाही हे लक्षात घेत आणि नागरिकांना होणार त्रास बघता अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या निधीतून अजून 5 नवीन ऍम्ब्युलन्स अकोट ग्रामीण रुग्णालयाला देण्यात येणार आहे त्याबाबत पत्रक ही जारी करण्यात आले आहे लवकरच त्या ऍम्ब्युलन्स सेवेत रुजू होतील संबंधित विषयाला घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर आणि अकोट चे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत समस्या निकाली काढली.

नागरिकांच्या समस्या सोडवण्या करता भाजप चे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा करून समस्या निकाली काढण्याचे काम करत आहेत. त्याचेच फळ म्हणून आज एक ऍम्ब्युलन्स अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली यावेळी भाजप युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर  अकोट शहर सरचिटणीस भाजप विलास बोडखे भाजयुमो तालुका अध्यक्ष गोपाल मोहोळ मंगेश ताडे,अजय खडसान,निवृत्ती गडम या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्ण चिकित्सक डॉ दातिर साहेब डॉ.तोरणेकर साहेब डॉ.कापसे साहेब व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments