Ticker

6/recent/ticker-posts

ॲरोव्हिले.....जीथे नांदतो माणूसकी हा धर्म

भारतातील एकमेव शहर, जेथील लोकांना कसलाच लोभ नाही 




या भारतात बंधुभाव

नित्य वसु दे 

दे वरचि असा दे....


या जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांसोबत आनंदाने, बंधूभावाने रहावा, यासाठी संत तुकडोजी महाराज प्रार्थना करतात. त्याचबरोबर अनेक संत, महात्म्यांनी या जगातील भेदभाव दूर व्हावा, हिंसाचार थांबावा, जातीवरून, धर्मावरून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी अनेक प्रयत्न केले. यात कधी धर्म, कधी पैसा तर कधी राजकीय पक्ष मध्ये आल्याने पाहिजे तसा सलोखा, बंधूभाव निर्माण होऊ शकला नाही. 


भारतात तर अठरापगड जाती-जमाती, जवळपास आठशे भाषा, वेगवेगळे धर्म, रितीरिवाज, हे सगळं बघता समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन नवा समाज निर्माण करण्याची कल्पना करणे अवघड वाटते. पण याच भारतात प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या एका टाउनशिप मध्ये हे सगळं शक्य झाल्याचे बघायला मिळते. 


ही टाउनशिप ॲरोव्हिले या नावाने जगप्रसिद्ध आहे. हिला 'योगी अरविंद आश्रम' आणि 'पहाटेचं गाव' म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. या शहरात कुठलाही धर्म, राजकीय पक्ष, कुठल्याही जाती नाही. येथे फक्त एकच धर्म बघायला मिळतो, तो म्हणजे माणूसकी.



कल्पनेच्या विश्वात असल्यासारखं वाटणारं हे शहर प्रत्यक्षात उभारलेलं स्वर्ग आहे. योगी अरविंद यांनी स्थापन केलेली ही आदर्श नगरी 28 फेब्रुवारी 1968 रोजी स्थापन करण्यात आली. या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणीही शासक नाही, कुठलेही कायदे नाही, कसलेही नियम नाहीत, पण तरीही येथील नागरिक नियम पाळून प्रेमाने, आपुलकीने राहतात. येथे रूढी, परंपरेला थारा नसून शिक्षण आणि संशोधन यांना जास्त महत्त्व दिल्या जाते. 


ऑरोव्हिले हे गाव दक्षिण भारतात वसलेलं आहे. याचा काही भाग तामिळनाडू राज्यात तर काही भाग केंद्रशासित प्रदेश असलेल्या पाँडेचेरी मध्ये येतो. योगी अरविंद यांच्या सहकारी असलेल्या मीरा अल्फांसा यांची ही कल्पना होती. त्यांचा हा विश्वास होता की, कसलेही नियम, कुठलाही धर्म, कुठलेही शासन याशिवाय माणूस चांगुलपणाने, प्रेमाने राहू शकतो.


भारतात याच विचारांचा जागर व्हावा, जगातील सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक इथे राहू शकतात, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न ऑरोव्हिलेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. 


येथे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहे. येथील लोक अतिशय प्रेमाने, बंधुभावाने एकत्र येऊन राहतात. येथील गावाची रचना ही आकाशगंगे प्रमाणे केलेली आहे. येथील गावांमध्ये वास्तव्यास असणारे लोक हे प्रामुख्याने 50 देशातून आलेले आहे. वेगवेगळ्या जमातीचे, धर्माचे, संस्कृतीमधील लोक येथे आनंदाने राहतात. 


दरवर्षी जवळपास पाच हजार लोक येथे भेटी देतात. येथे कुठलाही धर्म नाही, सत्य हाच ईश्वर असे येथे मानले जाते. या शहराच्या मध्यवर्ती भागात एक मातृमंदिर आहे. या मंदिरात जाऊन योग साधना केली जाते. एका वेळी जवळपास शंभर लोक येथे योग साधना करू शकतात. येथे गेस्ट हाउस, सभागृहे, संशोधन केंद्र, इंटरनेटची सुविधा देखील आहे. येथे शेती ही सामुहिक पद्धतीने 160 हेक्‍टर क्षेत्रावर केली जाते.

Post a Comment

0 Comments