Ticker

6/recent/ticker-posts

नमामि गंगे ऐवजी आता शवामी गंगे



चंद्रपूर | कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ते नदीत सोडून देण्यात आल्याची भयावह घटना काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये घडली आहे. या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. उत्तर प्रदेश मधील गाझीपूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर देखील मृतदेह तरंगताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 


या घटनेमुळे दोन्ही राज्यातील सरकारवर संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकेचा वर्षाव केला आहे. 


‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’, म्हणायची वेळ पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आली आहे, असं म्हणत बाळू धानोरकर यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यामुळे भारताचा संपूर्ण जगभरात अपमान झाला आहे. कोरोना विरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात मोदी सरकारने विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घ्यायला हवं, असं आवाहनही धानोरकर यांनी यावेळी केलं आहे.


या महामारीच्या काळात आतापर्यंत शेकडो मृतदेह गंगा नदीच्या प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये निष्पन्न झाले. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. ऐवढी भिषण परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. 


उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही उद्भवलेल्या या गंभीर स्थितीमुळे केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.


बलिया, गाझीपूरमध्ये मृतदेह नदीपात्रात सोडले जात आहेत तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा लपविल्या जात आहे. तेव्हा या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायिक तपास व्हावा, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments