Ticker

6/recent/ticker-posts

तेल्हारा तालुक्यात आणखी एक थरार; सरकारी कर्मचा-याची हत्या

From Pixabay


अकोला | गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात हत्येच्या घटनांचे सत्र वाढत चालले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात आपसी वादातून झालेल्या भांडणात देवीदास भोजने यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. यात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. ही घटना शांत होत नाही तोच तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. 


ही हत्या त्याच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव सुरेश भोजने आहे. मारेकऱ्यांनी हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. परंतू कर्मचा-याच्या घरात पडलेल्या रक्तावरून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे.


प्राप्त माहितीनुसार, सुरेश हे तेल्हारा पंचायत समितीत चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. गेल्या मागील काही वर्षांपासून ते त्यांच्या कुटुंबासह समितीच्या वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. परंतू अचानकपणे झालेल्या त्यांच्या हत्येने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भोजने यांच्या गळ्याला लावलेला फास पूर्णपणे टेकलेला नव्हता. दोरखंड आणि भोजने यांच्या मानेत बरेच अंतर होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


पंचनाम्यात पोलिसांना भोजने यांच्या गळ्यावर दोन व्रण आढळले आहेत. ज्या खोलीत मृतदेह होता, त्या खोलीत बऱ्याच ठिकाणी रक्त पडलेले होते आणि घरातील सामान विखूरलेल्या अवस्थेत होतं. 


ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा तपास सुरु असल्याचे तेल्हारा पोलीस स्थानकाचे पोलीस निलेश देशमुख यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments