Ticker

6/recent/ticker-posts

तर अकोल्यात होऊ शकते संपूर्ण लॉकडाऊन


बेजबाबदार नागरिकांसमोर प्रशासन हतबल;



अकोला: एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना दुसरीकडे नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा संपूर्ण लाॅकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. 


जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातही रूग्णसंख्येसोबत मृत्यूची संख्याही वाढत आहे. असे असतांनाही लोक मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तेव्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासन गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. 



जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत लाॅकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. अपार तसेच अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.


नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी सकाळी 8 ते 11 ही वेळ देण्यात आली आहे. परंतू काही लोक विनाकारण या वेळेत बाहेर पडून गर्दी करत आहेत. त्यामुळे ते कोरोनाला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहे. 


कोरोनाचा संसर्ग हा ग्रामीण भागातही वाढत आहे. 

वैद्यकीय सुविधा उपलब्ध असली तरी, उपचार पुरविणाऱ्या मनुष्यबळाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तेव्हा विनाकारण बाहेर पडणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन संपूर्ण लॉकडाऊनचा गांभिर्याने विचार करत आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

Post a Comment

0 Comments