Ticker

6/recent/ticker-posts

वन विभागाचे ठेवलेले पिंजरे बनले शोभेची वस्तू

वन विभागाची थातूरमातूर कार्यवाही, गावकरी कारवाईच्या प्रतीक्षेत




पुसद तालुक्यातील मांडवा शिवारात मागील दोन वर्षापासून वानरांच्या उच्छांदामुळे गावकरी व शेतकरी त्रस्त झाले होते. या संबंधित  वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय शेंबाळपिंपरी यांना शेतकरी व  गावकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती .आणि या शेतकरी व  गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने वानेरे पकडण्याची मोहीम दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी सुरु केली. आणि मांडवा येथे  अंदाजे २५ ते ३० वानेरांचा कळप वास्तव्य करीत आहे. त्यापैकी एका वानरांस पकडण्यात वनविभागास यश आले आहे.

११ डिसेंबर २०२० रोजी  श्री समर्थ नागोजी महाराज देवस्थानाच्या प्रांगणात वानरे पकडण्यासाठी दोन पिंजरे आणून ठेवून  दिली आहेत.आज रोजी एक हप्ता ओलांडून गेला आहे .  वानरे पकडण्याची मोहिम बंद असल्यामुळे हातातोंडाशी आलेले तुरीच्या पिकांचे वानरे नुकसान करीत आहेत.

वनविभागाने ज्या भागात वानरे वास्तव्य करतात त्या ठिकाणी पिंजरे ठेवून किंवा दुसरी उपायोजना करून वानरांना लवकरात लवकर पकडून नेतील अशी प्रक्रिया वनविभागाकडून दिसुन येईना.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments