Ticker

6/recent/ticker-posts

थंडीत कुडकुडणाऱ्या श्रमिक, गरजूंना ,पांघरली मायेची ऊब

 गरिबांच्या झोपडीत नाताळ सण साजरा






संपूर्ण जगभरात 25 डिसेंबर ला ख्रिसमस अर्थात, नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  ख्रिचन धर्मियांचा प्रमुख सणा पैकी ख्रिसमस हा मुख्य सण आहे.

 या दिवशी प्रभू येशूु चा जन्म झाला त्यांनी दया, क्षमा, करुणा समतेची शिकवण दिली म्हणूनच या दिवशी एकमेकांना शुभेच्छा  व भेटवस्तू देऊन ख्रिसमस सण साजरा केला जातो.

 ख्रिसमस सणाचे औचित्य साधून माणुसकीची भिंत पुसदच्या वतीने पी. एन.कॉलेज येथील शेजारील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब गरजू महिलांना  लहान बालकांना स्वेटर, व पुरुषांना ब्लॅंकेट,गोड, भेटवस्तू देऊन या कुटुंबीया सोबत ख्रिसमस  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

 बेबी मोरे, सुंदरबाई हिम्मत गिरे, अंजली शहाजी मोरे, बालु जी रावजी मोरे ,वनिता कृष्णा शिंदे, माया बळी, वाकोडे ,पार्वती पीठवलवाड, लताबाई, चंद्रकलाबाई, छायाबाई या इत्यादी कुटुंबीयांना स्वेटर व ब्लँकेट वाटप करण्यात आले. या ठिकाणी प्रमुख अथिती म्हणून पंकज पाल महाराज ,जयभाऊ उंटवाल ,सय्यद वाहिद,  राजेश खवले, साहेब, अजय भाऊ झरकर ऋषिकेश पाटील, विकी राठोड पीएसआय, सुरज काळे, निशांत डंबोळे, विकी चव्हाण, आकाश पाटील,  अध्यक्ष गजानन जाधव,  मधुकर  वाळूकर,  जगत रावल ,संतोष गावंडे, निलेश  बोरकर,  योगेश जाधव.  व इतर मान्यवर उपस्थित होते. पंकज पाल महाराज यांनी सर्व जनतेस आव्हान केले की कोणताही सण असो की जयंती, वाढदिवस,अश्या गरजवंता सोबत  साजरा करून सर्वांचा आनंद द्विगुणीत करावा असे भावनिक  आवाहन देखील करण्यात आले.

Vidharbhdoot, साठी यवतमाळ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments