Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणूक, शपथपत्र व हमीपत्र मुळे उमेदवारांचा गोंधळ

उमेदवारांची होत आहे दमछाक



यवतमाळ पुसद....यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सोबत जोडावे लागणार या कागदपत्रांवरून उमेदवारांचा गोंधळ चालू आहे.

शपथ पत्र हमीपत्र जात वैधता पावती स्वयंघोषणापत्र साठी साधा कागद की मुद्रांक वापरायेचा यावरून प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यातच नवीन बँक खाते बंधनकारक असल्याने खाते काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी सर्व बँकेकडे वाढत असून त्यातच तीन दिवसांपासून बँका बंद आहे. त्याचबरोबर आधीचे निवडणूक उमेदवारांची अनामत रक्कम भरली असल्याने अगोदरच्या अनामत रक्कम पूर्ववत करावी  अशी नागरिकांची मागणी आहे. एकूणच हे ग्रामपंचायत निवडणूक चिंताग्रस्त भयग्रस्त ठरत आहे.त्यातच राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना समितीपुढे सादर करण्यासाठी वंशावळीचे प्रतिज्ञापत्र दावा केलेल्या जातीचा पुरावा स्वच्छालय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचा ठराव कागदपत्र जमा करताना उमेदवारांची चांगलीच धावपळ होत आहे.सोमवारपासून चार दिवस मिळणार उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी आधी ऑनलाइन व नंतर तहसील कार्यालय अर्ज सादर करावा लागणार आहे त्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू आहे.एकूणच निवडणूक प्रक्रिया बाबत नागरिक धास्तावले असून जाचक अटी कमी कराव्यात निवडणूक प्रक्रिया सोपी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

यवतमाळ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments