Ticker

6/recent/ticker-posts

वन्य प्राण्यांना पकडून देण्यात वनविभागाचे कर्मचारी हजर





वानरांमुळे दोन वर्षापासून शेतकरी गावकरी होते त्रस्त

पुसद तालुक्यातील मांडवा येथे मागील दोन वर्षापासून वानरांमुळे शेतकरी  व  गावकरी त्रस्त झाले होते. कारण की वानरे खाण्याच्या शोधात गावात ये-जा करतात असे असताना वानंरा कडून गाव व शेत शिवारात येताना उच्छांद मांडत होता . गावात  अनेकांच्या घरावरील टिनपत्रे व घराचे नुकसान करत होते  तसेच .सोबतच वानेरे घरात घुसून अन्नधान्य घेऊन पसार होत आहेत .वानराकडून अनेक लहान मोठ्यांना इजा देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.या वानरामुळे  गावकरी व शेतकरी त्रस्त झाले होते. या वानरांचा बंदोबस्त लावावा या मागणीचे निवेदन  शेतकरी , गावकऱ्यांनी २७/१०/२०२० रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय  शेंबाळपिंपरी यांना देण्यात आले होते .या तक्रारीची दखल घेत आज दिनांक ११/१२/२०२० रोजी मांडवा येथील एका  वानेरास  सकाळी ९:००वाजता पिंजऱ्यामध्ये पकडून  योग्य ठिकाणी सोडण्यात आले .ज्या ज्या ठिकाणी वानरे येतात त्या त्या ठिकाणी पिंजरे ठेवुन वानरे  पकडण्यास सुरुवात केली आहे .यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पुसद निमकर, सचिन सावंत आर.एफ.ओ. शेंबाळपिंपरी ,  फिरते पथक पुसद मुकबीर साहेब, क्षेत्र साहाय्यक फुलवाडी आर .डी .जाधव, वनरक्षक मांडवा सोनाली बांदुरकर, व इतर शेंबाळपिंपरी सर्व कर्मचारी, व फिरते पथक कर्मचारी ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तसेच यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. आणि गावातील अनेक नागरिक वानरांना पकडण्याकरिता सहकार्य करीत आहेत.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments